गोड मानून घ्या

सोमवार, ५ सप्टेंबर, २०११


हे तुम्हाला पटतं का ?
पंतप्रधानांच्या सुचनेनुसार केंद्रीय व राज्यमंत्र्यांनी आपल्या आर्थिक परिस्थितीचा आढावा सादर केला आहे .
यातील अत्यंत गरिब मंत्री एम विरप्पा मोहली १३ लाख मालमत्ता , ए.के.अंटनी यांच्याकडे केवळ १ लाख ८२ हजार रुपये आहेत त्यांच्या पत्नीची परिस्थिती बरी आहे तिच्याकडे ३७ लाख १८ हजार रु.ची   मालमत्ता आहे.सुदीप बंदोपाद्याय यांच्याकडे ५६ लाखाची  मालमत्ता आहे.आपले शरद पवार १२ कोटी मालमत्तेचे धनी आहेत .पंतप्रधानांकडे ५ कोटीची मालमत्ता आणि हसु नका मारुती ८०० गाडी आहे.सर्वाधिक मालमत्ता कमलनाथ २५० कोटी आणि प्रफुल पटेल १०३ कोटी .
टू जी स्पेकट्रम मध्ये आपला हात साफ केलेले दयानिधी मारन यांना आपण उगीचच आरोपीच्या पिंज-यात उभी करतो ते केवळ २.९४ कोटीचे धनी आहेत .अनेक मंत्री बिचारे पदयात्रा करतात कारण त्याच्याकडे गाडी नाही .त्यांच्या देशसेवेवर प्रभावित होऊन एखाद्या दानशूर उद्योगपतीला या मंत्रांची दया येते आणि तो यांना अलिशान गाडी भेट देतो.

आता याचा विचार करू 
आपल्या आजूबाजूचे नगरसेवक ,जि.प.सदस्य , आमदार १० लाखा पासून ३० लाखा पर्यंतच्या गाड्या वापरतात.अनेक पुढा-यांच्या बायका गळ्यात सोन्याची खाण लटकवतात .कितीतरी गोल्डनमँन आहेत.तळातला कार्यकर्ता ईतका गरिब मग दिल्लीतला कसा काय श्रीमंत असणार ?
आता या अहवालात वयैक्तिक आणि एकत्रित मालमत्तेचा तपशील दिलेला आहे हे वेगळ ! .

 कृपया विचारू नका
पुतण्या ,भाचा , मामा ,मामी ,मेहुणा , साडू , जावई यांच्या मालमत्ते विषयी विचारू
नये . हे सर्व नातेवाईक अत्यंत हालाकीत आपले जीवन जगत आहेत

आणि हो महत्वाचे विसरलो बघा !
 कुणाला सांगू नका या मधून स्विस बँक वगळण्यात आलेली आहे.
आता जास्त नको नाहीतर मलाही हक्कभंगाची नोटिस मिळायची