युको बॅंक या सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकेत 1050 प्रोबेशनरी ऑफिसर्सची भरती करण्यात येणार आहे. 30 नोव्हें. 2010 रोजीच्या तरुण/ तरुणींचे वय 21 ते 30 वर्षांदरम्यान आहे त्यांच्यासाठी यासाठीच्या शैक्षणिक पात्रतेमध्ये किमान 55 टक्के गुण मिळवून कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी असणे गरजेचे आहे. निवड प्रक्रियेमध्ये लेखी परीक्षा व मुलाखत असेल. लेखी परीक्षा 30 जाने. 2011 रोजी मुंबई येथे होणार असून, त्यामध्ये दोन पेपर्स असतील.
पहिला पेपर पूर्णपणे ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाचा असून, त्यात 135 मिनिटांत सामान्यज्ञान व कॉम्प्युटर ज्ञान (50 प्रश्न, 60 मार्क); इंग्रजी (50 प्रश्न, 50 मार्क), अंकगणित (50 प्रश्न, 60 मार्क) व बुद्धिमत्ता चाचणी (75 प्रश्न, 80 मार्क) या चार विषयांवर 225 प्रश्न सोडवावे लागतील. दुसरा पेपर एक तासाचा असेल ज्यात 20 मार्कांचे 5 प्रश्न आर्थिक घडामोडी व कम्युनिकेशन स्किल्स या विषयांवर असतील.
या लेखी परीक्षेतून उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल व त्यातून अंतिम निवड केली जाईल. निवडलेल्या विद्यार्थ्यांना 22,188 रु. प्रतिमहा या वेतनावर प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून सेवेत सामावून घेतले जाईल. प्रोबेशन दोन वर्षांचे असेल व त्यानंतर उमेदवाराची कार्यक्षमता बघून त्याला सेवेत कायम केले जाईल. अर्ज ऑनलाइन पद्धतीने बॅंकेच्या www.ucobank.com या संकेतस्थळावर 30 नोव्हेंबर 2010 पर्यंत भरता येतील. याआधी या संकेतस्थळावरून फी चलन डाऊनलोड करून घेऊन बॅंकेच्या कोणत्याही शाखेत या चलनाद्वारे 400 रु. (एससी/एसटीसाठी 50 रु.) भरणे आवश्यक आहे.
कॉर्पोरेशन बॅंकेत 82 प्रोबेशनरी ऑफिसर्सची भरती
कॉर्पोरेशन बॅंक या सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकेत 82 प्रोबेशनरी ऑफिसर्सची भरती करण्यात येणार आहे. 1 नोव्हेंबर 2010 रोजी ज्या युवक/युवतींचे वय 20 ते 30 च्या दरम्यान असेल व जे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी किमान 55 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाले असतील अशा उमेदवारांना यासाठी अर्ज करता येईल.
निवड प्रक्रियेमध्ये लेखी परीक्षा व मुलाखत यांचा समावेश असेल, लेखी परीक्षा दिनांक 16 जाने. 2011 रोजी मुंबई येथे होईल. लेखी परीक्षेत दोन पेपर्स असतील, ज्यातील पहिला पेपर पूर्णपणे ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाचा व 300 मार्कांचा, अडीच तासांचा असेल, ज्यात बुद्धिमत्ता चाचणी व कॉम्प्युटर ज्ञान (60 मिनिटे, 100 प्रश्न, 17 मार्क), अंकगणित (30 मिनिटे, 50 प्रश्न, 75 मार्क), सामान्य ज्ञान (30 मिनिटे, 50 प्रश्न, 25 मार्क) व इंग्रजी (30 मिनिटे, 50 प्रश्न, 25 मार्क) या विषयांवर प्रश्न असतील. दुसरा पेपर एक तासाचा असेल ज्यात 20 मार्कांचे पाच प्रश्न सोडवावे लागतील.
या लेखी परीक्षेतून उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मुलाखतीला बोलावले जाईल. यातून निवडलेल्या उमेदवारांना 14500 - 25700 या वेतनश्रेणीमध्ये सामावून घेतले जाईल. या संधीसाठीचे अर्ज ऑनलाइन पद्धतीने बॅंकेच्या www.corpbank.in या संकेत स्थळावरील "करीअर्स' या लिंकवर जाऊन 30 नोव्हेंबर 2010 पर्यंत भरता येतील.
या आधी कार्पोरेशन बॅंकेच्या कोणत्याही शाखेत जाऊन 300 रु. (एससी/एसटी साठी रु. 50) भरून चलन प्राप्त करून घ्यावे लागेल.
सेंट्रल बॅंक ऑफ इंडियामध्ये 1163 क्लार्कची भरती
सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया या सार्वजनिक बॅंकेत 1163 क्लार्कच्या जागा भरण्यात येणार आहेत. 1 नोव्हेंबर 2010 रोजी ज्या युवक/युवतींचे वय 18 ते 28 वर्षांदरम्यान असेल व जे किमान 50 टक्के गुण मिळवून 12 वी उत्तीर्ण आहेत किंवा ज्यांच्याकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी आहे असे युवक/युवती या संधीचा फायदा घेऊ शकतील.
निवड प्रक्रियेमध्ये लेखी परीक्षा दि. 13 फेब्रुवारी 2011 रोजी मुंबई, पुणे व नागपूर या केंद्रांवर घेण्यात येईल. लेखी परीक्षेमध्ये दोन पेपर्स असतील. पहिला पेपर पूर्णपणे ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाचा असेल ज्यामध्ये 95 मिनिटांत 200 प्रश्न सोडवावे लागतील. यामध्ये बुद्धिमत्ता चाचणी, इंग्रजी, अंकगणित व क्लेरिकल ऍप्टिट्यूड या विषयांवर 50 प्रश्न असतील, दुसरा पेपर दीर्घोत्तरी स्वरूपाचा असेल.
यातून उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. यातून निवडलेल्या विद्यार्थ्यांना 7200-19300 या वेतनश्रेणीमध्ये सामावून घेतले जाईल. यासाठीचे अर्ज ऑनलाइन पद्धतीने बॅंकेच्या www.centralbankofindia.co.in या संकेतस्थळावर जाऊन भरावे लागतील.
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 8 डिसेंबर 2011 आहे. बॅंकांमधील या संधींचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लेखी परीक्षा फार अवघड असते असे नाही मात्र, 35-40 सेकंदात एक प्रश्न सोडवणे ही खरी कसोटी आहे. यासाठी अशा प्रकारचे प्रश्न सोडवण्याचे तंत्र व मंत्र समजावून घेणे गरजेचे आहे. यासाठी अनेक पुस्तके बाजारात आहेत, काही प्रशिक्षण संस्थाही आहेत. मात्र दररोज किमान 8 ते 10 तास अभ्यास, भरपूर सराव याला मात्र पर्याय नाही.संबंधित बातम्याउल्लेखनीय रोजगार संधी बदल : काळाची गरज कर्मचाऱ्यांचे समुपदेशन बदल : काळाची गरज 'उद्या'च्या बोधातून मुक्त होणे हाच प्रगती साधण्यासाठीचा उत्तम मार्ग
सौजन्य -विवेक वेलणकर ई-सकाळ
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा