अल्पसंख्याक समाजातील बेरोजगार व होतकरू तरुण-तरुणींसाठी व्यवसायाभिमुख शिक्षणाच्या संधी देऊन त्यांना रोजगारक्षम बनविण्यासाठी अल्पसंख्याक विकास विभागाने प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुक्त विद्यापीठ व तंत्रशास्त्र शिक्षण संचालनालयाच्या मान्यतेने राबविण्यात येणा-या अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणारे विद्यार्थी या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत.
अल्पसंख्याक समाजाला या योजनेचा लाभ त्यांना घेता येईल. तंत्रनिकेतन, अभियांत्रिकी महाविद्यालय यामध्ये निरंतर प्रशिक्षण योजनेंतर्गत विविध अभ्यासक्रम शिकविले जातात; तसेच राज्य तंत्रशिक्षण मंडळ व मुक्त विद्यापीठ यांच्यामार्फत विविध तांत्रिक अभ्यासक्रम राबविले जातात. या अभ्यासक्रमांचे शिक्षण घेणारे अल्पसंख्याक विद्यार्थी; तसेच सरकारी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) अल्पसंख्याक विद्यार्थी या योजनेस पात्र असतील. 31 मार्च 2011 पर्यंत जे विद्यार्थी या संस्थांमध्ये शिक्षण घेत आहेत, त्यांची यादी त्या त्या संस्थांनी तंत्रशिक्षण संचालनालयाकडे पाठवायची आहे. योजना मुस्लिम, बौद्ध, ख्रिश्चन, जैन, शीख व पारशी या अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी आहे.
विद्यार्थ्यांची निवड दहावीच्या गुणांवर केली जाणार आहे. तांत्रिक अभ्यासक्रमांमध्ये प्रशिक्षण घेणाअल्पसंख्याक समाजातील बेरोजगार व होतकरू तरुण-तरुणींसाठी व्यवसायाभिमुख शिक्षणाच्या संधी देऊन त्यांना रोजगारक्षम बनविण्यासाठी अल्पसंख्याक विकास विभागाने प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुक्त विद्यापीठ व तंत्रशास्त्र शिक्षण संचालनालयाच्या मान्यतेने राबविण्यात येणा-या अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणारे विद्यार्थी या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत.
तंत्रनिकेतन, अभियांत्रिकी महाविद्यालय यामध्ये निरंतर प्रशिक्षण योजनेंतर्गत विविध अभ्यासक्रम शिकविले जातात; तसेच राज्य तंत्रशिक्षण मंडळ व मुक्त विद्यापीठ यांच्यामार्फत विविध तांत्रिक अभ्यासक्रम राबविले जातात. या अभ्यासक्रमांचे शिक्षण घेणारे अल्पसंख्याक विद्यार्थी; तसेच सरकारी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) अल्पसंख्याक विद्यार्थी या योजनेस पात्र असतील. 31 मार्च 2011 पर्यंत जे विद्यार्थी या संस्थांमध्ये शिक्षण घेत आहेत, त्यांची यादी त्या त्या संस्थांनी तंत्रशिक्षण संचालनालयाकडे पाठवायची आहे. योजना मुस्लिम, बौद्ध, ख्रिश्चन, जैन, शीख व पारशी या अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी आहे.
विद्यार्थ्यांची निवड दहावीच्या गुणांवर केली जाणार आहे. तांत्रिक अभ्यासक्रमांमध्ये प्रशिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांना त्यांनी भरलेली प्रशिक्षण शुल्काची रक्कम किंवा चार हजार रुपये यापैकी जी रक्कम कमी असेल ती रक्कम सरकारकडून दिली जाईल. ज्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे, त्यांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. 30 टक्के जागा या मुलींसाठी राखीव आहेत. विद्यार्थ्यांची निवड तंत्रशास्त्र संचालनालय करणार आहे. राज्यातील अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांना सरकारी आयटीआयमधून अल्प मुदतीचे व्यावसायिक प्रशिक्षण घेण्याकरताही सरकार अनुदान देणार आहे. यासाठी मॉड्युलर एम्प्लॉएबल स्कीममधून शिकणाऱ्या पाच हजार विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ दिला जाईल. प्रशिक्षण शुल्क तसेच परीक्षा फी प्रत्येक विद्यार्थ्यासाठी दीड हजार रुपये व प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यासाठी दोन हजार रुपये किमतीचे टुल किट दिले जाईल विद्यार्थ्यांना त्यांनी भरलेली प्रशिक्षण शुल्काची रक्कम किंवा चार हजार रुपये यापैकी जी रक्कम कमी असेल ती रक्कम सरकारकडून दिली जाईल. ज्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे, त्यांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. 30 टक्के जागा या मुलींसाठी राखीव आहेत. विद्यार्थ्यांची निवड तंत्रशास्त्र संचालनालय करणार आहे. राज्यातील अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांना सरकारी आयटीआयमधून अल्प मुदतीचे व्यावसायिक प्रशिक्षण घेण्याकरताही सरकार अनुदान देणार आहे. यासाठी मॉड्युलर एम्प्लॉएबल स्कीममधून शिकणाऱ्या पाच हजार विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ दिला जाईल. प्रशिक्षण शुल्क तसेच परीक्षा फी प्रत्येक विद्यार्थ्यासाठी दीड हजार रुपये व प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यासाठी दोन हजार रुपये किमतीचे टुल किट दिले जाईल
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा