गाण्याचा पत्ता लिहून घ्या

मंगळवार, ७ डिसेंबर, २०१०

गाणं कोठे असतं ?
फूलपाखरू फुलावरी बसतं,
गाणं तिथे असतं !

तान्हुल्या बाळासारखं
उगीच आपलं मन हसतं
गाणं तिथे असतं !

दातओठ खाऊन कधी गाणं मिळत नाही,
हावरं हावरं धावून कधी गाणं मिळत नाही !

गाणं कुठे मिळतं ?

टपटप थेंब जिथे फुलं होतात,
हिरवी पानं खेळवणारी मुलं होतात,
झाडांच्या मुळांकडे
कोवळं पाणी वळतं
गाणं तिथे मिळतं !

माझं नसतं,
तुझं नसतं,
पाठीवरचं ओझं नसतं !

मन जेव्हा मोरासारखं आनंदाने
नाचत नाचत झुलू लागतं
आपण काहिच करीत नाही
गाणं तेव्हा आपोआप फुलू लागतं !

   मंगेश पाडगावकर

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा