रोहा - मुरुड रस्त्यावर असणारा काशिदचा समुद्रकिनारा गोव्यामधील समुद्रकिना-यांची आठवण करून देतो. रूपेरी वाळूचा स्वच्छ सुंदर काशिदचा समुद्रकिनारा विदेशी पर्यटकांचे मुख्य आकर्षण तर आहेच परंतु एक अप्रतिम आणि भेट द्यायला हवा असा हा समुद्रकिनारा आहे. विकएंडला पर्यटकांची इथे समुद्रस्नानासाठी झुंबड असते.पार्किगसाठीही जागा नसते त्यामुळे विकएंड अथवा सुट्टी हंगाम सोडून इथे येणे चांगले.या ठिकाणी घोडागाडी,उंटावरिल सफर ,किनार्यावरील झोपाळे असल्याने बच्चे कंपनी खुष होऊन जाते तर तरूणांसाठी वाँटर स्कुटर आहेत.चांगली सुविधा असणारी हॉटेल्स रिसॉर्टस् यामुळे काशिद समुद्रकिनारा पर्यटकांचे मोठे आकर्षण बनला आहे.काशिदच्या किनार्यासमोर सुरुचे सुंदर बनही आहे.मॉडेंलिंग टि.व्ही. सिरीयल व सिनेमांच्या शूटींगसाठी हा समुद्रकिनारा प्रसिद्ध आहे.या किना-यावर वेळ कसा जातो हे कळतही नाही आणि तोंडातून नकळत शब्द बाहेर पडतात,बीच असावा तर असा !
बीच असावा तर असा ! |
घोडागाडी |
वाँटर स्कुटर |
सुरुचे बन |
ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
उत्तर द्याहटवा