article लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
article लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, १२ ऑगस्ट, २०२३

अनेक रंगरुपे बदलली तरी छत्र्याची जादू आजही कायम

अनेक रंगरुपे बदलली तरी छत्र्याची जादू आजही कायम 
Magic of Umbrella

महाड पाऊस सुरु झाला की पहिली आठवण होते ती छत्रीची .आणि मग कपाटात, अडगळीच्या ठिकाणी असलेल्या छत्रीचा शोध सुरु होतो.नाहितर नविन छत्र्यांची खरेदी होते.आजोबांची लाकडी दांड्यांची लांब छत्री असो नाहितर पर्समध्ये राहणारी आईताईची इवलीशी छत्री असो.छत्र्यांची अनेक रंगरुपे काळानुसार बदलत राहिली.पावसात गरागरा छत्री फिरवणारी बच्चे कंपनी आणि चित्रपटातील छत्रीतील गुणगुणाविशी वाटणारी गाणी याचा आनंद काही वेगळाच. डोक्यावर केळीचे नाहितर सागाचे पान घेत सुरु झालेला या छत्रीचा प्रवास आणि रंगीबेरंगी छत्र्याची जादू आजही कायम आहे. 




 ऊन व पाऊस यांच्यापासून संरक्षण करण्यासाठी छत्रीचा वापर होत असला तरी तिची खरी निकड भासते ती पावसाऴ्यात.वापरण्यास व सांभाळण्यास सोयीची असलेली ही छत्री अनेक रंगरुपात बाजारात मिळू लागली आहे.हमखास विसरली जाणारी अशी ही वस्तु असली तरी ती लोकांना फार आवडते.व्यक्तिगत उपयोगा बरोबरच, समुद्रकिनारी, उपाहारगृहात सावलीसाठी असलेल्या मोठ्या छत्र्या लक्ष वेधून घेतात.बघता बघता हॉटेलमधील मॉकटेल, कॉकटेल ही पेयं आकर्षक दिसण्यासाठी ग्लासवर देखील छोट्याशा छत्रीने जागा पटकावली आहे. ईजिप्त, निनेव्ह, पर्सेपलिस इत्यादींमधील जुन्या धर्मग्रंथांत छत्रधारी व्यक्तींच्या आकृत्या आढळतात. फार पूर्वी ईजिप्त, ॲसिरिया इ. देशांतील गुलाम आपल्या मालकाच्या डोक्यावर सावलीसाठी धरीत असलेल्या आच्छादनासारख्या वस्तूतून छत्रीचा उदय झाला असावा.सामर्थ्य व सार्वभौमत्वचे छत्र हे एक प्रतीक आहे.राजे महाराजांसाठीही डोक्यावर धरण्यासाठी छत्र वापरले जाई.छत्रधारी,छत्रपती अशी बिरुदावली यामुळे निर्माण झाली.अशी ही महत्वाची छत्री. आता छत्रीमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. स्वयंचलित,समुद्रकिनारा, फोल्डींग, बबल,सरळ,मुलांसाठी,क्लासिक, कॉकटेल,डिजिटल,फॅशन गोल्फ, टोपी, उलटा,पेपर, अंगण व वादळ असे छत्र्यांचे प्रकार आहेत.छत्र्या आता ऑटोमॅटिक झाल्या आहेत.काळ्या रंगापासुन आता छान आकर्षक रंग आणि हवी तशी प्रिंटेड नक्षीच्या छत्र्या बाजारात उपलब्ध आहे.काही कंपन्या जाहिरातीसाठीही छत्रीचा वापर करत आहेत.अशा छत्र्या फूकट वाटल्या जात आहेत अथवा उत्पादन खरेदीवर मोफत दिल्या जात आहेत.राजकीय पक्षांकडूनही छत्री वाटप केले जात आहे.पाण्याचे थेंब किंवा पाऊस पडल्यावर रंग बदलणारी छत्री सध्या ट्रेंडमध्ये आहे.ही छत्री तीन फोल्डमध्ये असून तिचा आकारही मोठा आहे. त्यावर फ्रॅब्रिक प्रिंट असून त्यावर पाण्याचे थेंब किंवा पाऊस पडल्यावर याचा रंग बदलतो. रंग बदलल्यानंतर त्यावरील नक्षी दिसते. या छत्रीची किंमत 800 रुपये आहे.बाजारात 200 रुपयांपासुन छत्र्यांच्या किंमती आहेत.फ्लाँवर प्रिंट,एम्ब्राँयडरी,इंद्रधनुष्य रंगी,बाटलीच्या आकारातील,ठिबक्याच्या असे अनेक रंगरुपाच्या छत्र्यांनी बाजारपेठ व्यापलेली आहे.काळनुसार बदलत गेलेल्या छत्रीची बाजारात आजही जादू कायम असल्याचे दिसत आहे. पावसापासून संरक्षण करण्याकरिता छत्रीचा उपयोग प्रथम फ्रान्समध्ये सोळाव्या शतकात करण्यात आला.1709 पासून ख-या अर्थाने छत्र्या बनवण्यात येत होत्या. छत्री बाळगणे सोपे जावे म्हणून फोल्डिंग छत्रीचा शोध लागला.या शोधाने छत्री व्यवसायात क्रांती झाली. फोल्डिंग छत्री खुपच लोकप्रिय झाली आहे. .
............

मंगळवार, २ फेब्रुवारी, २०२१

रायगडकर केकच्या प्रेमात

रायगडकर पडलेत केकच्या प्रेमात,  

सुनील पाटकर

चॉकलेट ,पायनॅपल , ब्लॅक करंट यासह विविध प्रकारांच्या केकच्या प्रेमामध्ये सध्या रायगड कर पडले असून  जिल्ह्यामध्ये केकच्या दुकानांची तसेच उलाढालीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढू लागले आहे .
केक म्हटले की अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते .बच्चे कंपनीला तर केक चा मोह आवरता येत नाही .वाढदिवसाला सर्रासपणे कापले जाणारे चेक आता घरोघरी वेगळ्या कारणाने व समारंभासाठी दिसू लागले आहेत. कोणत्याही प्रकारच्या निमित्तसाठी अगदी लग्न समारंभातही केक कापण्याची प्रथा आता रूढ होऊ लागली आहे.पूर्वी बेकरीच्या बरणीत कपमध्ये दिसणारा  केक आता विविध आकार व चवीत दिसू लागला आहे .या सर्वांचा परिणाम रायगड जिल्ह्यातील बाजारपेठेवर होत  आहे . गेले वर्षभरामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये केकच्या दुकानांचे प्रमाण वाढू लागले आहे .यापूर्वी केवळ बेकरीमध्ये केक मिळत असे.परंतु आता केक ची स्वतंत्र दुकाने उघडली जात आहेत. मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण होऊ लागल्याने अनेक नामांकित ब्रँड रायगड कडे वळू लागले आहेत. मॉन्जीनीस , दिंशॉ इलाईट यासारख्या देशभरातील ब्रँड प्रमाणेच रायगड जिल्ह्यात प्रसिद्ध असलेल्या मयूर बेकरीची ही केक शॉपी जिल्ह्यात पसरत आहेत .यामुळे रायगडकर आता केकच्या प्रेमात पडलेले आहे. जिल्हयामध्ये मागील काही महिन्यात सुमारे 42 नवीन केकची दुकाने उघडली गेली आहेत. यामुळे सुमारे दोनशे स्थानिकांना रोजगार मिळाला आहे . रायगड जिल्ह्यात 145 केकच्या दुकानातून वार्षिक सुमारे पाच ते सहा कोटीची उलाढाल होत असते . कंपन्याचे टेंपो केक घेऊन जिल्ह्यातील सर्व दुकामात रोज पुरवठा करत असतात .
वाढदिवसा साठी लागणारे मोठे मोठे केक घरी नेले जात असतातच परंतु त्यापेक्षाही या दुकानांमध्ये येऊन पेस्ट्रीज खाण्याचे प्रमाणही वाढलेले आहे. महिला वर्गामध्ये ही केकच्या क्लासेसचे ही वाढलेले आहेत . अनेक महिला घरी केक बनवून सोशल मीडियावर त्याचे छायाचित्र प्रकाशित करून आपल्या केक ची विक्री करत असतात . अशा महिलानाही ही चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळत आहे .
काही दुकानदार एक तासा मध्ये आपल्या नावा सहीत केक तयार करून देत असतात केकच्या या बाजारपेठेत मोठा केक .कप केक,पेस्ट्रिज , डोनट्स, मफीन्स याचे 100 हून अधिक केकचे प्रकार उपलब्ध आहेत.
.........
केकचे प्रकार तरी किती ?
मँगो .व्हॅनिला ,चॉकलेट,मावा, पायनापल,स्ट्रॉबेरी, अलमौण्ड,ओरँज, बनाना,कोकोनट, रसमलाई,लिची, पिस्ता,मिक्सफ्रूट,,गनाश,ट्रफल,रेड वेल्वेट चीज क्रीम,पिनाकोलाडा, .केशर ,फालुदा,रोजफालुदा,पिस्ताफालुदा,मोजीतो 
 मन्गोंमलाई,ब्लूबेरी, वेरीबेरी,रबडी, मैंगोग्रीन, वेलची,बटरस्कॉच, कालाखाट्टा, पाइन अॅपल, रूहअफ्जा,चेरी, ब्लैककरंट,रेडरोज, रम, पानमसाला, ब्लैकफ़ोरेस्ट, व्हाइटफ़ोरेस्ट
,,,,,,,,