मंगळवार, २ फेब्रुवारी, २०२१

रायगडकर केकच्या प्रेमात

रायगडकर पडलेत केकच्या प्रेमात,  

सुनील पाटकर

चॉकलेट ,पायनॅपल , ब्लॅक करंट यासह विविध प्रकारांच्या केकच्या प्रेमामध्ये सध्या रायगड कर पडले असून  जिल्ह्यामध्ये केकच्या दुकानांची तसेच उलाढालीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढू लागले आहे .
केक म्हटले की अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते .बच्चे कंपनीला तर केक चा मोह आवरता येत नाही .वाढदिवसाला सर्रासपणे कापले जाणारे चेक आता घरोघरी वेगळ्या कारणाने व समारंभासाठी दिसू लागले आहेत. कोणत्याही प्रकारच्या निमित्तसाठी अगदी लग्न समारंभातही केक कापण्याची प्रथा आता रूढ होऊ लागली आहे.पूर्वी बेकरीच्या बरणीत कपमध्ये दिसणारा  केक आता विविध आकार व चवीत दिसू लागला आहे .या सर्वांचा परिणाम रायगड जिल्ह्यातील बाजारपेठेवर होत  आहे . गेले वर्षभरामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये केकच्या दुकानांचे प्रमाण वाढू लागले आहे .यापूर्वी केवळ बेकरीमध्ये केक मिळत असे.परंतु आता केक ची स्वतंत्र दुकाने उघडली जात आहेत. मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण होऊ लागल्याने अनेक नामांकित ब्रँड रायगड कडे वळू लागले आहेत. मॉन्जीनीस , दिंशॉ इलाईट यासारख्या देशभरातील ब्रँड प्रमाणेच रायगड जिल्ह्यात प्रसिद्ध असलेल्या मयूर बेकरीची ही केक शॉपी जिल्ह्यात पसरत आहेत .यामुळे रायगडकर आता केकच्या प्रेमात पडलेले आहे. जिल्हयामध्ये मागील काही महिन्यात सुमारे 42 नवीन केकची दुकाने उघडली गेली आहेत. यामुळे सुमारे दोनशे स्थानिकांना रोजगार मिळाला आहे . रायगड जिल्ह्यात 145 केकच्या दुकानातून वार्षिक सुमारे पाच ते सहा कोटीची उलाढाल होत असते . कंपन्याचे टेंपो केक घेऊन जिल्ह्यातील सर्व दुकामात रोज पुरवठा करत असतात .
वाढदिवसा साठी लागणारे मोठे मोठे केक घरी नेले जात असतातच परंतु त्यापेक्षाही या दुकानांमध्ये येऊन पेस्ट्रीज खाण्याचे प्रमाणही वाढलेले आहे. महिला वर्गामध्ये ही केकच्या क्लासेसचे ही वाढलेले आहेत . अनेक महिला घरी केक बनवून सोशल मीडियावर त्याचे छायाचित्र प्रकाशित करून आपल्या केक ची विक्री करत असतात . अशा महिलानाही ही चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळत आहे .
काही दुकानदार एक तासा मध्ये आपल्या नावा सहीत केक तयार करून देत असतात केकच्या या बाजारपेठेत मोठा केक .कप केक,पेस्ट्रिज , डोनट्स, मफीन्स याचे 100 हून अधिक केकचे प्रकार उपलब्ध आहेत.
.........
केकचे प्रकार तरी किती ?
मँगो .व्हॅनिला ,चॉकलेट,मावा, पायनापल,स्ट्रॉबेरी, अलमौण्ड,ओरँज, बनाना,कोकोनट, रसमलाई,लिची, पिस्ता,मिक्सफ्रूट,,गनाश,ट्रफल,रेड वेल्वेट चीज क्रीम,पिनाकोलाडा, .केशर ,फालुदा,रोजफालुदा,पिस्ताफालुदा,मोजीतो 
 मन्गोंमलाई,ब्लूबेरी, वेरीबेरी,रबडी, मैंगोग्रीन, वेलची,बटरस्कॉच, कालाखाट्टा, पाइन अॅपल, रूहअफ्जा,चेरी, ब्लैककरंट,रेडरोज, रम, पानमसाला, ब्लैकफ़ोरेस्ट, व्हाइटफ़ोरेस्ट
,,,,,,,,

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा