बुधवार, २ ऑगस्ट, २०२३

व्हेटीव्हर ग्रासची लागवड दरडग्रस्त गावांसाठी ठरू शकते वरदान

 व्हेटीव्हर ग्रासची लागवड दरडग्रस्त गावांसाठी ठरू शकते वरदान

सुनील पाटकर 



मुसळधार पाऊस सुरू झाला की डोंगरातील माती आपली जागा सोडते.आणि मग भूस्खलन आणि दरडी कोसळण्यासारख्या घटना घडतात. हजारोंचे बळी घेणारी ही दरड थांबवता येणे शक्य्य आहे का असा प्रश्न मनात घर करू लागतो. होय दरडी कोसळणे थांबविण्याचेे काम एक  साधे गवत करूू शकते. विश्वास बसत नाही ना .या गवताचेेेे नाव आहे व्हेटीव्हर ग्रास , मराठीत याला चक्क वाळा किंवा खस म्हणून ओळखले जाते. उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून पाण्यात आपण जो वाळा टाकतो तेच हे गवत. अगदी शुल्लक असणारे हे गवत दरडीपासून हजारोंचेेे जीव वाचवू शकते.

काही दिवसांपूर्वी इरशाळवाडी येथे दरड कोसळल्याने शेकडोजण दरडीखाली  गाडले गेले आहेत. तसेच यापूर्वी महाड तालुक्यात  पारमाची, दासगाव ,कोंडीवते ,जुई ,रोहन व तळीये या गावांवर दरड कोसळून शेकडो जणांचे बळी गेले आहेत. त्यामुळे दरड कोसळणे व भूस्खलनाचा प्रश्न पुन्हा एकदा आ वासून उभा आहे. आता यावर प्रभावीपणे उपाय करण्याची गरज निर्माण झालेली आहे.

देशातील घडणाऱ्या अशा विविध घटनांमुळे NIDM ( National Institue of Disasater Management) मधील प्राध्यापकांनी यामागील कारणे शोधली. दरड कोसळणे थोपविण्यासाठी जमिनीची मशागत करून व्हेटीव्हर ग्रास  ची लागवड केल्यास प्रतिबंध होऊ शकतो असे मत व्यक्त त्यांनी केले होते. त्यामुळे अशा दरडी कोसळण्याच्या संभाव्य शक्यता असलेल्या जागी जल-मृद्‌संधारणासाठी वनीकरण अत्यंत गरजेचे असते हे पुढे आले.पहिला पाऊस पडला की  पावसानंतर लगेचच मातीत गवत उगवते. या गवतामुळे हजारो टन मातीचे संवर्धन होते; परंतु बऱ्याचशा भूभागावर गवतही आढळत नाही, अशा परिस्थितीमध्ये मोठे नुकसान होते. अशा ठिकाणी व्हेटीव्हर ग्रासची लागवड वरदान ठरणार आहे.व्हेटीव्हर ग्रास ची लागवड केल्यास  दरडी कोसळण्याला आळा घालता येऊ शकतो. भारतात २०१३ मध्ये कोईमतूर नेहरू आर्टस आणि सायन्स सेंटरने निलगिरी पर्वतांच्या भागातील जमीनीची धूप थांबविण्यासाठी ह्याचा वापर केला होता. तसेच ह्याच प्रोजेक्ट्चा भाग म्हणून उटी-कोटगिरी हायवे वरील कोडप्पामुड , उटी- मेट्टुपलायम नॅशनल हायवे येथील मरापालम आणि कलहट्टी येथे याची गवताची लागवड केली होती. अगदी कोकण रेल्वे येथे सुध्दा दरडी कोसळून होणारे प्रचंड नुकसान टाळण्यासाठी ह्याच  व्हेटीव्हर ग्रास चा उपयोग केला होता. भारतामध्ये शंतनु भट्टाचार्य या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्याने आसाममधील ब्रह्मपुत्रा नदी मुळे होणारे भूस्खलन थांबविण्यासाठी याचा प्रथम प्रयोग करून त्याबाबतचा फोटो प्रबंध सादर केला आहे. हा उपाय यशस्वी झाल्यानंतर 2014 मध्ये आसाम मधील गुवाहाटी येथे मोठी दरड कोसळल्यानंतर या ठिकाणी  व्हेटीव्हर ग्रास लावण्याचा प्रकल्प  शंतनु भट्टाचार्य ह्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु झाला.इतकेच नव्हे तर डॉ.पाऊल त्रूओंग  Director, Vetiver Network International, Brisbane, Australia ह्यांनी  व्हेटीव्हर ग्रास लावून भूस्खलन थांबविता येऊ शकते हे आपल्या फोटो प्रबंधातून सिद्ध केले आहे. त्यामुळे भारतात तसेच कोकणात वारंवार घडणाऱ्या दरड दुर्घटनांवर ही उपाय योजना प्रभावी ठरू शकेल.उन्हाळ्यामुळे शरीरातील तापमान थंड राहावे यासाठी आपण वाळ्याचे सरबत अथवा थंड पाणी पितो. काही ठिकाणी उन्हाची तीव्रता रोखण्यासाठी खिडक्यांना वाळ्याचे पडदे लावलेल्या असतात. हे गवत प्राधिक काळ टिकणारे असते ते अत्यंत चिवट व मातीला घट्ट धरून ठेवणारे असते.म्हणूनच . पडीक माळराने, नापिक जमिनी, जास्त धूप होणाऱ्या जमिनी इ. ठिकाणी लागवडीसाठी ही वनस्पती उपयुक्त आहे. बायोइंजिनिअरिंग मध्ये ह्या व्हेटीव्हर ग्रास  चा उपयोग फिजी, इटली, हैती, जावा , साऊथ आफ्रिका, वेस्ट इंडिज इत्यादी बरेच देश भू-संधारणासाठी मोठ्या प्रमाणावर करतात. भारतात याची प्रथम सुरुवात झाली होती. परंतु नंतर गांभीर्याने पाहिले गेले नाही. आता काही संशोधकांनी केलेल्या प्रयत्नांमुळे या गवतापासून अनेकांचे जीव वाचू शकणार आहे. मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटात अशा प्रकारची लागवड करण्याचे नियोजन तात्कालीन कार्यकारी अभियंता वसईकर यांनी केले होते. परंतुु त्याला गती मिळाली नाही. कमी खर्चामध्ये होणारी व्हेटीव्हर ग्रास लागवड दरड प्रवण क्षेत्रामध्ये अशी लागवड झाल्यास ती दरड प्रवण क्षेत्रासाठी वरदान ठरणार आहे

.................

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा